शेअर बाजार माहिती

शनिवार, 10 नवंबर 2018

शेअर बाजार बेसिक माहिती

शेअर बाजारा बद्दल लोकांची असणारी भावना म्हणजे सट्टा बाजार अशीच आहे, बऱ्याच लोकांना अजून शेअर बाजार बद्दल कुतूहल असून पैसे कसे कमावतात या बद्दल माहिती नाही आहे, शेअर बाजार मध्ये पैसे जमवणे तेवढ सोप्प नाही पण अवघड पण नाही####

               
                       चला तर मग आज आपण शेअर बाजार मध्ये लागणाऱ्या डिमॅट अकाऊंट (demat ac) व ट्रेडिंग अकाउंट (trading ac) पासून सुरुवात करूया, तर मित्रांनो जसे आपण आपल्या कमाई चे पैसे बँके मध्ये ठेवतो तसच आपण घेतलेले शेअर हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्या साठी आपल्याला एका डिमॅट अकाउंट ची गरज असते हे डिमॅट अकाउंट आपण कुठल्याही ब्रोकर कडे उघडू शकतो तसेच काही बँक पण डिमॅट अकाउंट सेवा देत आहेत, sbi axis etc.. तसेच इंटरनेट वर search करून तुम्ही चांगल्यात चांगला ब्रोकर त्यांचा रेटिंग नुसार निवडू शकता, तुम्हाला डिमॅट अकाउंट साठी वर्षाला काही चार्जेस पडतात ते प्रत्येक ब्रोकर चे वेगवेगळे असू शकतात,

                         आता आपल्याला गरज पडते ती ट्रेडिंग अकाऊंट ची तर प्रत्येक ब्रोकर डिमॅट अकाउंट सोबत च ट्रेडिंग अकाउंट पण उघडुन देतात, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे तुम्हाला स्वतः शेअर विकत घेणे व विकणे च अकाउंट. तुम्हाला दोन्ही अकाउंट उघडण्या साठी काही documents ची आवश्यकता लागते जसे की...
1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 बँक स्टेटमेंट 6 महिने चे
4 पासपोर्ट फोटो 2
5 बँक पासबुक झेरॉक्स
 तुम्ही आता ऑनलाइन अकाउंट पण उघडू शकता कुठल्या ही ब्रोकर जवळ न जाता, आता जवळ पास सर्व च ब्रोकर्स नि आपले स्वतःचे मोबाइल अँप तयार केले आहेत आणि त्यामुळे तुम्ही कुठे ही असला तरी ट्रेडिंग करू शकता पण त्या साठी तुम्हाला तुमचा बँक मध्ये असलेल्या अकाउंट मध्ये नेट बँकिंग internet banking चालू केलेले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला ब्रोकर जवळ जाण्याची नेहमी गरज राहणार नाही, तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही तुमचा ट्रेडिंग अकाउंट मध्ये घेऊन शेअर खरेदी विक्री करू शकाल कुठेही राहून,
                           मोबाईल अँप द्वारे खूप सहज झाली आहे ट्रेडिंग करणे, फक्त इंटरनेट रेंज चांगली असल्या ची खात्री करावी, आज आपण डिमॅट अकाऊंट बद्दल माहिती बघितली आता शेअर कसे निवडायचे कंपनी बद्दल माहिती कशी मिळवायची, कुठल्या गोष्टींचा शेअर बाजार वर परिणाम होऊन मार्केट खाली वर होऊ शकते हे सर्व आपण पुढील भागा मध्ये बघू, आज चा हा ब्लॉग कसा वाटला मला कंमेंट करून कळवा आणि काही प्रॉब्लेम आल्यास पण कमेंट करा मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद!!!

11/11/2018

तर मित्रांनो मी परत आलो आहे आपल्या knowledge मध्ये भर घालायला, या आठवड्या मधील आपला टॉपिक आहे शेअर बाजार बेसिक माहिती
                                आपण काल बघितलं की शेअर बाजार मध्ये शेअर खरेदि विक्री साठी आपल्याला अकाऊंट ची गरज असते त्याला डीमॅट demat आणी ट्रेडिंग trading अकाऊंट असे म्हणतात, आणि कुठल्याही ब्रोकर agent कडे तुम्ही ते दोन्ही अकाउंट उघडू शकता, आता आपण बघू अकाऊंट उघडले आता पुढे काय,
                                  तर मित्रांनो जेंव्हा तुम्ही ट्रेडिंग ला सुरुवात करता तेंव्हा विना अभ्यास विना माहिती कुठल्याही कंपनी चे शेअर घेऊ नका, सुरू करण्या पूर्वी आपल्या ब्रोकर ची मदत घ्या, कंपनी ची स्टडी कशी करायची कंपनी चे मागील रेकॉर्डस् पुढे असणाऱ्या संधी या सर्व गोष्टी चा स्टडी तसेच तज्ञ लोकांचे मार्गदर्शन आणि आज काल बऱ्याच गोष्टी इंटरनेट वर उपलब्ध आहेत, तुम्ही youtube, blogs, आणि news channels बघून कंपन्या ची माहिती गोळा करू शकता, तुमचा ब्रोकर agent जर तुम्हाला ती सर्विस देत असेल तर नवीन असताना घ्यायला काही हरकत नाही, सुरुवातीला blue chip कंपनी निवडा, एकदम जास्त पैसे एकाच कंपनी मध्ये इन्व्हेस्ट न करता वेगवेगळ्या कंपनी आणि थोडे थोडे इन्व्हेस्ट करा, जास्त शेअर न घेता कमी कमी घ्या, तुम्ही एक शेअर पण घेऊ शकता, आणि लांब अवधी साठी घ्या म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट आहे त्या वर लागणारा टॅक्स पण कमी लागेल. कर्ज काढून गुंतवणूक करू नका, जी रक्कम तुमची बचत आहे तीच रक्कम वापरा, ज्या कंपनी बद्दल तुम्हाला वाटते की ह्या शेअर चे भाव वाढणार त्या मध्ये एकदम मोठी रक्कम ची गुंतवणूक करू नका, थोडे थोडे करून गुंतवणूक करा. Intraday trading सुरुवातीला करू नका, जो पर्यंत तुम्हाला तुमचा स्वतः वर विश्वास होत नाही की आपण शेअर चा चांगला अभ्यास करू शकतो तो पर्यंत intraday trading (म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतले त्याच दिवशी विकणे) करू नका.

 शेअर बाजार वर परिणाम करणाऱ्या गोष्टी
1 निवडणूक राज्य आणि केंद्र
2 वार्षिक बजेट
3 जगातील कच्चा तेलाचे भाव
4 युद्ध स्थिती
5 ट्रेड वार
6 अमेरिका सारख्या देशाचे मार्केट पडणे किंवा वर जाणे
7 डॉलर चा बदल्यात रुपयाची किंमत वाढणे किंवा कमी होणे
8 दुष्काळ etc.....
असे अजून बरेच कारणे आहेत ज्यामुळे मार्केट खाली किंवा वर जाऊ शकते, तर सांगायचं तात्पर्य एवढं च मित्रांनो की परिपूर्ण अभ्यास असल्या शिवाय कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे तुम्हाला नुकसान होईल, खूप अभ्यास करा, कोणी तुम्हाला सांगितलं की या कंपनीचे भाव वाढणार शेअर घे तर कोना वर ही विश्वास ठेऊ नका, स्वतः अभ्यास करणे कंपनी चा अभ्यास करने शिका.
      चला तर मित्रांनो आजचा साठी एवढं च पुढचा भागा मध्ये आपण बघू की कंपनी चा स्टडी कसा करायचा,
        धन्यवाद........🙏